Tuesday, June 2, 2015

नारायणाचा बाप कोण ?


Pritam Rangari
June 1 at 10:18pm
 
नारायणाचा बाप कोण ? 
सत्यनारायणाच्या भंकस कथा बंद झाल्या पाहिजेत, 
अशी जळजळीत टीका अमरावती जिल्ह्यातील 
अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ११ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. 
आणि या सत्यनारायणाचा बाप कोण 
यावर सार्वजनिक चर्चा सुरु झाली. 

यावर अरुण जावळे यांनी २२ मार्च २०१३ च्या लोकप्रभा साप्ताहिकात लिहीलेला 'सत्यनारायण कुठून आला ?' हा लेख. 
सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे 
दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सत्येन पीर हा मुस्लिम 
दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत 
असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत. 
नंतर ब्राह्मणही जाऊ लागले. 
पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले. पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सत्येन मधल्या ' सत्ये' चा ' सत्य' 
केला आणि ' न' चा ' नारायण' झाला आणि 'सत्य- नारायण' अस्तित्त्वात आला. 
पुरोहित वर्गाने 
हा नवा धंदा तात्काळ 
ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने 
वाढविला. त्यासंबंधीच्या पोथ्या लिहिल्या. स्कंद 
पुराणात 
सत्यनारायणाची कथा घुसडली आणि त्याला प्राचीनतेचा, 
पौराणिकतेचा टच दिला. 
मराठी माणसाला ज्या वारकरी परंपरेचा वारसा लाभला त्यात 
ही पूजा कुठेच नाही. शिवाजीमहाराजांन 
ी आयुष्यात ही पूजा एकदाही केली नाही. 
दिवसरात्र देवदेव, जपजाप्य करणाऱ्या आणि कर्मठ 
कर्मकांडांबद्दल कुप्रसिध्द 
असणाऱ्या पेशवाईतही सत्यनारायणाचे नामोनिशाण 
नाही. अलीकडच्या शंभर-सव्वाशे वर्षांत 
सत्यनारायण चौखूर उधळला. 
८ नोव्हेंबर १९५६ रोजी बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये 
धार्मिक कार्यक्रम आहे, त्याला या, असे निमंत्रण 
गाडगेमहाराजांना मिळाले. ते गेले तर तिथे 
सत्यनारायणाची पूजा होती. संत गाडगेमहाराज 
जाम भडकले. 'तुमचा हा सत्यनारायण 
बुडालेल्या नौका वर काढतो ना, मग मुंबई बंदराजवळ 
भारताची एक नौका आपल्या देशाचं सोनंनाणं घेऊन 
बुडालेली आहे ती बाहेर काढण्यास 
त्याला का सांगत नाही? निघाले सारे हाप मॅड 
सत्यनारायण करायला,' असा जळजळीत 
टोला त्यांनी उपस्थितांना लगावला. 
प्रबोधनकार 
ठाकरेंनाही कुणीतरी सत्यनारायणाला बोलावले 
तेव्हा ते सत्यनारायणाचे हे थोतांड ताबडतोब बंद 
करा असे गरजले. ' संकटाचे निवारण करेल किंवा केले 
म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची तर आधी संकट 
आणलेच कसे 
यासाठी त्याची झाडाझडती घ्यायला हवी, 
सत्यनारायणाचे हे लफडे घराच्या बाहेर फेकून द्या,' 
इतक्या संतापाने त्यांनी सत्यनारायणावर 
हल्ला केला आहे. एकदाच नव्हे तर आयुष्यभर! 

घरात चोरी झाली..., 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 

अतिरेकी हल्ल्यात जिव गेला..., 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 

कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो..., 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 

राजकारन्यांनी अवघा देश लुटून खाल्ला...., 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 

कुपोषानामुळे लाखो बालके मरतात.., 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 

देशात स्त्री भ्रूण हत्या होतात...., 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 

हुंडाबळी मुळे मुलींचे बाप बेजार 
झालेत..., 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 

भर दिवसा तरुनीवर बलात्कार झाला..., 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 

अरे बस्स झाल तुझ पाठिशी रहाणे, 
मर्दा सारखा जरा पुढे ये !!!

No comments:

Post a Comment